ख्रिश्चन बांधवांना त्यांच्यासाठी पवित्र असलेल्या जेरूसलेमचे दर्शन फुकटात करुन देण्याची घोषणा भाजपने केली आहे. मात्र जेरुसलेम ची ही मोफत यात्रा देशातील सर्व ख्रिश्चनांसाठी आहे की फक्त उत्तर-पूर्व राज्यांसाठी ते मात्र भाजपने स्पष्ट केलेलं नाही. यामुळे ख्रिश्चन बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांमध्ये फेब्रवारी मध्ये मतदान होणार आहे. त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारी रोजी तर नागालँड आणि मेघालयामध्ये २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून या तिन्ही राज्यांमधील मतमोजणी ३ मार्च रोजी होणार आहे. या राज्यांमध्ये हिंदूपेक्षा ख्रिश्चनांची लोकसंख्या अधिक आहे. यामुळे या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप जेरुसलेमच्या आड नवीन खेळी खेळण्याचा प्रयत्न करत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews